Headlines

मुकेश अंबानी त्यांच्या जेवण बनवणाऱ्या कूकला देतात तब्बल एवढा पगार, जाणून घ्या नक्की कोणते पदार्थ ते बनवतात !

भारतातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांच्या नावाची गणती केवळ भारतापुरतीच मर्यादित नसुन जगातल्या पहिल्या दहा श्रीमंत लोकांच्या यादीत सुद्धा मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते.

आता एवढी श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर त्यांचे राहणीमान त्यांची जीवनशैलीसुद्धा त्याच्या स्टेटसला साजेशिच असणार यात शंकाच नाही. त्यांची जीवनशैलीबाबत अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते. पण मुकेश अंबानींकडे जेवण बनवणाऱ्या कुकचे जीवन कसे असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?

मुकेश अंबानींच्या घरी तब्बल ६०० नोकर आहेत. आणि ते सर्व ऐशो आरामाचे जीवन जगतात. त्याच्या पगाराबद्दल बोलायचे झाल्यास मुकेश अंबानी त्यांच्या ड्राइव्हरपासुन ते अगदी त्यांच्या कुक पर्यंत सर्वांना दर महिना २ लाख रुपये पगार देतात.

मुकेश अंबानींच्या स्टाफला मिळतात या सुविधा – मुकेश अंबानी यांच्या घरात नोकरी मिळणे सोपी गोष्ट नाही. त्यांचा साधा नोकर बनण्यासाठी सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तुम्हाला वाचुन धक्का बसेल पण मुकेश अंबानींकडे काम करण्याऱ्या स्टाफला पगारा व्यतिरिक्त इंशोरंस आणि एज्युकेशन अलाउंस सुद्धा मिळतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या स्टाफची मुले विदेशात शिक्षण घेतात.

साधं जेवण बनवण्यासाठी सुद्धा कुकना मिळतो मोठा पगार – आता तुम्हाला वाटेल कि एवढा श्रीमंत व्यक्ती म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याचे आवडी सुद्धा मोठ्या असतील. त्यांच्या कुकना रोज ५६ प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागत असतील पण तसे काही नाही. कारण अंबानी कुटुंब साध जेवण जेवणे पसंत करते.

मुकेश अंबानी हे स्वत: शुद्ध शाहाकारी असल्यामुळे त्यांना जेवण देखील साधेच लागते. त्यांना गुजराती पदार्थ जास्त आवडतात. शिवाय इडली सांबर ही डीश सुद्धा त्यांना आवडत असल्यामुळे त्यांच्यासाठी अनेकदा बनवली जाते. तर नीता अंबानी यांना एग व्हाइट ऑमलेट आवडत असल्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ते तयार केले जाते.

अंबानी कुटुंबाचा त्याच्या स्टाफशी व्य़वहार कसा आहे – विशेष सांगायचे झाल्यास मुकेश अंबानी हे स्वत:सुद्धा कुकिंग करतात. त्यांच्या व्यतिरिक्त जर त्यांच्या कुटुंबात कोण चांगल जेवण बनवत असेल तर ती त्यांची मुलगी इशा अंबानी. या बाबतची माहिती स्वत: नीता अंबानी यांनी एका इंटरव्ह्यु दरम्यान दिली होती. त्यामुळे तुम्ही समजुन तर गेला असालच कि अंबानी कुटुंबात काम करणाऱ्या नोकरांची सुद्धा चांदी असते. तिथे साधं जेवण बनवुन सुद्धा ते लाखो रुपये कमवतात.

अंबानी कुटुंबाचा त्याच्या स्टाफशी असलेल्या व्य़वहाराबद्दल बोलायचे झाल्यास ते त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागवतात. त्यांच्यासोबत त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या स्टाफशी सुद्धा त्यांचा व्यवहार चांगला आहे. त्यांच्या प्रोपर्टी बद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे २ मिलियन अमेरिकन डॉलर्स किंमतीचे एंटीलिया हे घर मुंबईत आहे. या व्यतीरीक्त त्यांच्या कडे कित्येक करोड रुपयांच्य़ा गाड्या, हॅलिकॉप्टर वगैरेच्या सुविधा आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !