Headlines

या कारणामुळे विधवा भावजयीसोबत लहान दीरानी थाटामाटात बांधली लग्नगाठ, जाणून घ्या !

परिस्थितीमुळे कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. कधी कोणाचं नशीब पालटतं तर कधी एका क्षणात होत्याचं नव्हतं होत. अशीच काहीस घडलं अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावात. या गावात राहणाऱ्या प्रांजली मोटे हीचा पती महेश मोटे याचे दोन वर्षांपुर्वी अपघातात मरण पावला. नवऱ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे प्रांजली व तिचे सात महिन्याचे बाळ पोरके झाले. त्यामुळे आपल्या मुलीचे पुढे कसे होणार याची चिंता प्रांजलीच्या माहेरच्यांना लागली. पण त्यांची ही चिंता प्रांजलीच्या सासरच्या मंडळींनी दूर केली.

जग कितीही आधुनिक होत असले तरी आपल्या देशात अजुनही विधवा पुर्नविवाहास अजुनही सकारत्क दृष्टीकोनातुन पाहिले जात नाही. अजुनही बऱ्याच ठिकाणी समाजाच्या रुढी पंरपरेच्या पलिकडे जावुन काहीतरी केले की, समाज लगेच वाळीत टाकतो. किंवा त्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी फारसा चांगला व्यवहार कोण करत नाही. पण सोनई गावात या बाबतीत भलताच समंजसपणा दाखवला.

कारण दोन वर्षापुर्वी अपघात मृत्यू झालेल्या आपल्या मुलामुळे पोरकं झालेल्या आपल्या सुनेला आणि नातीला नव्याने जीवन जगण्याची संधी दिली. तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच संजय मोटे यांनी प्रांजलीचा पुन्हा लग्न लावुन दिले तेही तिच्याच छोट्या दिराशी. 7 जानेवारीला या दोघांच्या संमतीने अगदी थाटामाटात त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाचे साऱ्या गावाने यथेच्छ आनंदाने स्वागत केले.

भावाच्या अ’का’ली निधनामुळे संपुर्ण कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला होता. महेंद्रच्या बायकोची व त्याच्या छोट्या बाळाची अवस्था खुप बिकट झाली होती. त्यामुळे प्राजंलीच्या सासऱ्यांनी त्यांच्या छोट्या मुलाला म्हणजेच महेंद्रला प्रांजलीशी लग्न करण्याचे सुचवले.

तसेच भावाला श्रंद्धाजली वाहायची असेल तर ती त्याच्या बायकोशी लग्न करुन तिच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाचा किरण आणुन दे असे महेंद्रला त्याच्या वडिलांनी व त्या गावच्या सरपंचानी समजवले. महेंद्रला सुद्धा ही गोष्ट पटली त्यामुळे तो त्याच्या वहिनीसोबत लग्न करण्यास तयार झाला. आपल्या वहिनीला आणि छोट्या मुलीला नवीन आयुष्य देण्यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला.

माझ्या लहान मुलाचा व विधवा सुनेचा ठरलेला विवाह मोजक्या लोकांत लपूनछपून एखाद्या मंदिरात केला असता. मात्र, मी समाजापुढे प्रेरणा ठरावी म्हणून मोठ्या थाटात हा विवाह केला आहे. यातून एकाने जरी आदर्श घेतला तरी हे कार्य सफल झाल्याचं समाधान होईल.असे प्रांजलीचे सासरे संजय मोटे यांनी सांगितले.

बॉलीरिपोर्टच्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेछया ! या घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवल्याबद्दल धन्यवाद !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्याला या लग्नाबद्दल काय वाटतं ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा !