Headlines

पेनकिलर (वेदनाशामक गोळ्या) तुमच्या शरीराचे करत आहे असे नुकसान, जाणून घ्या त्यापासून कसे वाचायचे !

दैनंदिन धावपळीत आपण व्यायाम, मेडीटेशन यांसारख्या गोष्टी करणे टाळतो. कारण आपण दिवसभर काम करुन इतक थकुन जातो की पुन्हा सकाळी लवकर उठुन व्यायाम करावासा वाटत नाही. पण व्यायाम न केल्यामुळे शरीराची हानी होते. शरीर आखडून जाते. शरीरातील र*क्तवाहिन्या घट्ट होतात. त्यामुळे पाटदुखी, पायदुखी यांसारखी दुखणी ओढवतात. मग असी दुकणी ओढावली कि काही लोक पेन किलर (वेदनाशामक) घेउन तात्पुरता इलाज करतात.

तुमच्यावर तात्पुरता इलाज करणारी ही औषधे मात्र तुमच्या आयुष्यास हानिकारक ठरु शकतात. एका संशोधनातुन सिद्ध झाले आहे कि, आवश्यकतेपेक्षा जास्त पेन किलरचे सेवन केल्यास शरीराला हानि पोहोचते. पेन किलरचे अधिक सेवन केल्यास तुमच्या शरिराच्या काही अवयवांवर त्याचा परीणाम होतो. सोबतच तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका किंवा तुमची किडनी फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे पेन किलर हे डॉक्टरांच्या सल्ल्याने सिमित मात्रेत घ्यावीत.

आज आम्ही तुम्हाला पेन किलर्स तुम्हाला कसे नुकसानदायक आहेत हे सांगणार आहोत. आपल्याकडे गोळ्या, इंजेक्शन, सिरप, क्रिम यांच्या रुपात नानाविविध पेनकिलर उपलब्भ आहेत. अनेक संशोधनातुन सिद्ध झाले आहे कि अधिक पेन किलरचे सेवन तुमच्या मेंदुवर परिणाम करते. यामुळे तुम्हाला मेंदु संबंधी वेगवेगळे विकार होण्याची शक्यता असते. तर काही पेन किलर्स तुमच्या किडणी आणि लिवरवर सुद्धा परिणाम करत असतात. यामुळे तुमचे लिवर व किडनी फेल होण्याची शक्यता असते. सोबत या औषधांच्या अधिक सेवनामुळे माणुस डिप्रेशन मध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असते.
तुम्ही औषधानुसार पाहु शकता कि ते किती धोकादायक आहे.

1. पॅरासिटामॉल – पेन किलर म्हणुन पॅरासिटामॉल या औषधाचा अधिक वापर केला जातो. असे म्हटले जाते कि हे औषध विशिष्ट मात्रे पर्यंतच शरीर झेलु शकते. प्रमाणापेक्षा जर त्याचे अधिक सेवन झाल्यास शरिराला एलर्जी होण्याची शक्यता असते. सोबतच लिवर खराब होण्याचा सुद्धा अधिक धोका संभवतो. त्यामुळे तुम्ही जर या पेन किलरचे सेवन करत असाल तर ते घेण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

2. NSAID – अनेक पेन किलर्स हे Non-Steroidal Anti Inflammatory Drugs असतात. यामध्ये ibuprofen, naproxen, diclofenac, celecoxib असे ड्र*ग्स येतात.त्यामुळे तुम्ही घेत असलेले औषध हे NSAID तर नाही ना याची खात्री करा. याचा वापर ताप आल्यावर किंवा काही दुखत असल्यास केला जातो. यामध्ये स्टेरॉइड्स नसते. याच्या अधिक सेवनामुळे किडनी, हार्ट, ब्ल*ड आणि लिवरसंबंधी इनफेक्शन होऊ शकते. याचाच अर्थ हे औषध शरीरीच्या विविध भागांवर वाईट परिणाम करते.

3. Opioids – या औषधाची विक्रीसुद्धा बाजारात मोठ्याप्रमाणात होते. यामध्ये morphine, codeine, fentanyl असे ड्र*ग्स येतात.हे औषधसुद्धा पेन किलर म्हणुन अधिक वापरले जाते. कॅन्सरच्या उपचारा दरम्यानसुद्धा या औषधाचा वापर केला जातो. हे लॉंग टर्म पेन रिलीफ म्हणुन वापरले जाते. त्यामुळे हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. या औषधामुळे डिप्रेशन, युरिन इंफेक्शन, उलटी यांसारखे त्रास होतात. या व्यतिरिक्त किडना आणि हार्ट संबधी सुद्धा धोका उद्धभवतो.

पेन किलर सतत वापरल्यास शरीराचे खूप नुकसान होते त्यापेक्षा तुम्ही खाली दिलेले घरगुती उपाय करून तुमची दुखणे दूर घालवू शकता. यासाठी पुढील उपाय करा.
आलं – पोटदुखी अपचन किंवा पचन यासंबंधी इतर त्रास असल्यास लिंबाच्या रसात आल्याच्या रसाचे काही थेंब मिसळून ते प्यावे. त्यामुळे लवकर आराम पडतो. याचे सेवन केल्यास सांधे दुखी व स्नायू दुखी पासून आराम मिळतो. सूज आलेल्या ठिकाणी आल्याचे तेल लावून मसाज केल्यास त्याचा खूप फायदा होतो. आल्याची चहा सर्दी खोकला असल्यास सेवन करावी याने खूप आराम मिळतो तसेच त्यासाठी औषध सुद्धा घ्यावे लागत नाही.

कॉफी – कॉफी मध्ये असलेले कॅफिन नैसर्गिक पद्धतीने दुखणे दूर करते. तुम्ही जर तणावात असाल किंवा तुमचे डोकं दुखत असेल तर एक कप कॉफी प्यावी. मात्र दिवसातून जास्तीत जास्त २ कपच कॉफीचे सेवन होईल याकडे लक्ष द्यावे.
सालमन आणि मॅक्रल फिश – सी फूड खाल्ल्याने मुळे टेस्ट सोबतच चांगले आरोग्य देखील मिळते. सालमन आणि मॅक्रल फिश मध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते जे पेन किलरसारखे काम करते. यासोबतच त्यामध्ये विटामिन डीचे प्रमाण अधिक असते यामुळे सांध्यांमध्ये दुखणे, यूरिक ॲसिड यांसारख्या समस्या दूर होतात.

पुदिना – पुदिना सुद्धा दुखणे कमी करण्याचे काम करतो. पोटात गॅस, छातीत जळजळ, अपचन, पोटदुखी यांसारख्या समस्या असतील तर पुदिना असलेले ग्रीन टी प्यावी. वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो.
ऑलिव ऑइल – ऑलिव ओईल सुद्धा पेन किलरसारखे काम करते. यामध्ये एंटीऑक्सीडेंट पॉलिफिनॉल असते जे दुखणे कमी करण्यासाठी मदत करते. खाण्यामध्ये लोणी ऐवजी ऑलिव ऑइल चा उपयोग करावा. त्यामध्ये उपलब्ध असलेले हाय सॅच्युरेटेड फॅट दुखणे कमी करण्यासोबतच हाडेसुद्धा मजबूत करतात. एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये १२० कॅलरी असतात. मात्र लक्षात ठेवा ऑलिव ऑइल सुद्धा अधिक सेवन करू नये.

नट्स – बदाम आणि अक्रोड मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट उपलब्ध असतात ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही सॅलाडमध्ये याचा समावेश करावा. किंवा दुपारच्या जेवणानंतर त्यांचे सेवन करावे.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरी मध्ये विटामिन सी आणि एंटीऑक्सीडेंट चे गुण असतात यामुळे दुखणे कमी होते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, जा लोकांचे ऑपरेशन झालेले असते त्या लोकांना विटामिन सी ची आवश्यकता असते. त्यामुळे अशा लोकांनी स्ट्रॉबेरीचे सेवन करावे यामुळे त्यांचे दुखणे कमी होऊन त्यांची रिकवरी जलद गतीने होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.