Headlines

प्रियसीच्या आईसाठी प्रियकराने काढून दिली किडनी, पण प्रियसीने केले दुसऱ्याशीच लग्न, बघा नक्की काय झालंय !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हे आपण ऐकलंच असेल. एकदा का एखादी व्यक्ती प्रेमात पडली की मग आपल्या प्रेमासाठी जे जमेल ते करायला ते तयार असतात. आपल्या जोडीदारासाठी सर्व काही करण्याची त्यांची तयारी असते. आपलं प्रेम, आपलं नातं वाचविण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. असाच की किस्सा हाळी मेक्सिकोमध्ये घडला. एका प्रियकराने आपल्या प्रियसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी आपली स्वतःची किडनी काढून दिली, परंतु त्याच्या प्रियसीनेच कुठल्या तिसऱ्याच व्यक्तीबरोबर विवाह केला.

द सनच्या ऑनलाईन दिलेल्या माहितीनुसार, वरील घडलेली सर्व घटना त्या प्रियकराने सोशल मीडियावर मंडळी आहे. तो मुलगा एक शिक्षक असून त्याच नाव उजिएल मार्टिनेज आहे. वरील घटना मेक्सिकोमधील असून त्या मुलाने सोहस्ल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की त्याच्या प्रियसीच्या आईची हालत फारच चिंताजनक होती कारण त्यांची किडनी खराब झाली होती आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना तात्काळ किडनीची आवश्यकता होती.

तेव्हाच त्या मुलाने असा निर्णय घेतला की तो स्वतःची किडनी काढून आपल्या प्रियसीच्या आईला दान म्हणून देणार. त्याने डॉक्तरांच्या टीसोबत संपर्क साधला आणि आपली किडनी काढली. त्यांनतर डॉक्तरांनी त्या प्रियसीच्या आईचे ऑपरेशन केले व त्या ठीक झाल्या. परंतु त्या प्रियकराला अंदाज नव्हता की त्याच्यामागे नेमकं काय घडत आहे.

प्रियसीच्या आईच्या ऑपरेशनच्या एका महिन्यानंतर त्या प्रियसीने त्या मुलाशी ब्रेकअप केला आणि त्या ब्रेकअप करण्यामागे कारण होते की ती दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली होती. इतकेच नव्हे तर त्या दुसऱ्या मुलासोबत तिने लग्नदेखील केले. या प्रियकराने सोशल मीडियावर असा व्हिडीओ शेयर करत आपले दुःख व्यक्त केले आहे.

व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्या मुलाची प्रशंसा करत तो खूप दिलदार व्यक्तिमत्त्वाचा आहे आणि त्याला सोडून जाऊन ती मुलगी आनंदी राहणार नाही, इतके देखील नेटकरी म्हणाले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !