Headlines

कोर्टाच्या निर्णयानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार जास्त की चुलत भावाचा ? जाणून घ्या !

पुर्वी पासुन आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती चालत असल्याचे आपण कित्येकदा वाचले किंवा पाहिले असेल. पण आता काळानूरुप त्यात बदल होत आहेत. मुलींनाही मुलांप्रमाणे समान वागणुक तसेच समान हक्क दिले जात आहेत. संपत्तीच्या बाबतीत ही मुलींना ग्राह्य धरले जात आहे.

यातच आता वडिलांच्या मालमत्तेवरील मुलींच्या हक्काबाबत स’र्वो’च्च न्यायालयाने एका नवा निर्णय दिला आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्याची मुलगी उत्तराधिकारी म्हणुन ग्राह्य धरली जाईल असे न्यायलयाकडुन म्हणण्यात आले आहे. त्या मुलीला तिच्या वडिलांच्या भावाच्या मुलांपेक्षा मालमत्तेचा वाटा देण्यात येईल. हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 लागू होण्यापूर्वी मालमत्ता वितरणालाही अशी व्यवस्था लागू होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

तमिळनाडुतील एका केस मध्ये एका इसमाचा १९४९ मध्ये मृत्यू झाला. त्या इसमाने त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबातील विभाजित मालमत्तेसाठी कोणतेच मृत्युपत्र तयार केले नव्हते. मृ’त इसम हा एकत्रित कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे त्यावेळी मद्रास उच्च न्यायालयाने भावाच्या मुलांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क दिला होता. पण आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्या व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या मुलीचे वारस तो खटला लढवत होते.

वडिलांच्या मालमत्तेवर मुलींना समान अधिकार असल्याचे हिंदू उत्तराधिकार नमुद केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. किंबहुना हा कायदा येण्यापुर्वी देखील मुलींना संपत्तीच्या अधिकारांना मान्यता होती असे न्यायालयाने म्हटले. त्या व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती तसेच कुंटुंबातुन मिळणारी संपत्ती ही एखाद्या व्यक्तीला मुलगा नसला तरी त्याच्या भावाच्या मुलांऐवजी त्याच्या मुलीला मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !