Headlines

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिला पोलिसाने ला’च प्रकरणावर दिला हा धक्कादायक खुलासा !

अनेकदा वाहतुक किंवा रहदारीचे नियम तोडले कि ट्रॅफिक पोलिस पकडतात आणि मग त्यांना आपल्याला फाइन द्यावा लागतो. मात्र तो फाइन भरावा लागु नये म्हणुन काही वेळा काही लोक त्या पोलिसांनाच काही पैसे देऊन फाइन न घेण्याची विनंती करतात. पैशांच्या हव्यासा पोटी हे काही भ्र’ष्ट पोलिस देखील त्यांच्याकडुन ते पैसे गपचुप घेऊन त्या माणसांना जाऊ देतात. खरेतर लाच घेणे आणि ला’च देणे हे दोन्ही प्रकार कायद्याने गुन्हा आहेत. मात्र आपल्याकडे हे प्रकार सर्रास घडत असतात.

काही दिवसांपुर्वी पिंपरीतील महिला वाहतुक पोलिस लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे अनेकांनी पोलिसांना भ्र’ष्टा’चा’री म्हणत त्यांच्यावर टिकास्त्र सोडली होती. सदरच्या व्हिडीओ मध्ये एक महिला पोलीस ला’च घेत असल्याचे भासत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी स्वत:ची चूक कबूल केलेली नाही.

या महिला पोलिसाने त्यांच्या वरिष्ठांकडे या प्रकरणाबाबत लेखी खुलासा सुद्धा दिला. त्यात त्यांनी, पैसे देणारी महिला ही माझ्या ओळखीची होती. त्यांनी वस्तू खरेदी केली होती त्याचे पैसे मी दिले होते. मात्र त्यांनी ते त्या दिवशी परत दिले असं आपल्या खुलाश्यामध्ये म्हटलं. मात्र तरीही हा सर्व प्रकार पोलिसांच्या गणवेशात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै’द झाला आणि लोकांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पोलिस डिपार्टमेंटचे नाव खराब होउ नये यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले.

याबाबतची सविस्तर घटना म्हणजे…काही दिवसांपुर्वी पिंपरीतील मुख्य बाजारपेठेतील चौकात महिला पोलिस त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काम करत होत्या. त्यावेळेस दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना त्यांनी अडवलं. त्यावेळी त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले आणि अचानक त्या दोन महिलांपैकी एका महिला खाली उतरली त्यावेळी महिला पोलिस यांनी इतरांची नजर चुकवून पॅन्ट च्या पाठीमागील खिशात पैसे टाकण्यास त्या महिलेला सांगितले.

त्या महिलेने तसे करत हळुच महिला पोलिस यांच्या पॅंटच्या मागच्या खिशात पैसे ठेवले आणि त्या दोन्ही महिला तातडीने तिथुन निघुन गेल्या. हा सर्व प्रकार एकाने गपचुप त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे त्या पोलिस ठाण्याची ना’च्च’की होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे महिला पोलिस यांनी ताबडतोब या प्रकरणाचा लेखी खुलासा द्यावा असे आदेश त्यांच्या वरिष्ठांनी दिले.

मात्र तरीही महिला पोलिसाला त्याची चुक मान्य नव्हती. त्यांनी या लेखी खुलाशातुन पळवाट काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पिंपरी वाहतूक पोलिसांनी दिली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !