Headlines

पूर्वीच्या काळी या कारणामुळे राजे महाराजे करत असत जास्त लग्न, आणि ठेवत होते जास्त राणी !

भारताच्या प्राचीन इतिहासानुसार एकेकाळी भारतावर अनेक वेगवेगळ्या राजामहाराजांची सत्ता होती. देशाच्या प्रत्येक कोन्यात कोणत्याना कोणत्या राजाची हुकुमत चालायची. या राजांच्या आदेशावरुनच युद्ध सुरु व्हायचे. परंतु भारतीय इतिहासात राजांसोबत त्यांच्या राण्यांचा देखील उल्लेख केलेला दिसुन येतो. इतिहासात आपण राजांची त्यांनी केलेल्या लढायांची माहिती वाचतो मात्र त्यांच्या लग्नांविषयी फारशी माहिती कोणला नसते.

त्यावेळी राजांचे एकापेक्षा अधिक लग्न होत पण ती लग्न म्हणजे राजांचा शौक होता कि प्रेम याबाबत ठोस काही सांगता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही राजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केली आणि त्यांचे शौक सुद्धा अजीब प्रकारचे होते.

१. भरतपुरचा राजा किसन सिंह याने एक नव्हे तर तब्बल ४० लग्ने केली. या राजाला पोहण्याची फार आवड होती. तो त्याची आवड पुर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायचा. या राजाने त्याची आवड पुर्ण करण्यासाठी गुलाबी संगमरवराचा तलाव बनवला. एवढेच नव्हे तर या तलावामध्ये उतरण्यासाठी चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या पायऱ्यापण बनवल्या. या पायऱ्यांवर दोन व्यक्ती आरामात उभ्या राहु शकतात अशा प्रकारे त्या शिडीची रचना करण्यात आलेली. त्यावेळी या राजाच्या बायका त्या पायऱ्यांवर निर्वस्त्र होऊन हातात मेणबत्ती घेऊन राजाच्या स्वागतासाठी उभ्या रहायच्या. या मेणबत्त्यांचा प्रकाश लख्ख येण्यासाठी इतर प्रकाशाची साधने बंद केली जायची. त्यानंतर ज्या राणीची मेणबत्ती जास्त काळ जळत राहायची त्या राणी सोबत राजा रात्र घालवयचा.

२. राजा फिरोजशहा तुगलक या राजाबद्दल जाणुन घेऊ.. फिरोजशहा त्यावेळी राजा बनला नव्हता तर तो केवळ एक राजकुमार होता. त्याला शिकारीचा छंद होता. त्यावेळी जंगलात एक अशी जागा होती जिथे काही लोक त्यांच्या परिवारासोबत राहायचे. तिथे गुजरी नावाची एकल महिला रोज दूध विकायला यायची. तिथेच फिरोजशहाची ओळख गुजरीशी झाली. आणि तो तिच्या प्रेमातच पडला. त्यानंतर जेव्हा फिरोजशहाने गुजरीला दिल्ली दरबारात आदरणीय स्थान देऊ केले त्यावेळी तिने तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर फिरोजशहाने गुजरीला भेटण्यासाठी हिसार येथे एक किल्ला बांधला आणि स्वत: साठी एक गुजरी महल बांधण्याचा आदेश दिला. फिरोज शाहचे गुजरीवर प्रेम असूनही अनेक विवाह केले होती.

३. पटीयालाचा राजा भुपेंद्र सिंहला तब्बल २८ मुले होती. त्यांच्या हरम मध्ये अनेक स्त्रीया असायच्या. ज्या राजाला एकापेक्षा अधिक राण्या असायच्या आणि त्या राण्या एकत्रितपणे ज्या खोलीत राहायच्या त्या खोलीला हरम असे म्हटले जायचे. या खोलीत इतर पुरुषांना येणे वर्ज होते. असे म्हटले जाते की राजा भुपेंद्र सिंह वर्षातुन एकदा निर्वस्त्र होऊन हरम मध्ये परेड करायचा जेणेकरुन तो अजुन जिवंत आणि तंदुरुस्त असल्याची खात्री त्याच्या पत्नींना व्हावी.

४. मुघल बादशहा शाहजहांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील. शहाजहांने त्याची पत्नी मुमताज हिच्यावर असलेल्या प्रेमापोटी ताजमहाल बांधला होता. १४ व्या बाळाला जन्म देताना मुमताजचा मृत्यु झाला होता त्यावेळी ती केवळ ३९ वर्षांची होती. महत्वाची बाब म्हणजे शहाजहांचे मुमताजवर इतके प्रेम होते की तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच पत्नी सोबतच मुलांना जन्म दिला नाही. त्यामुळे सतत मुलांना जन्म दिल्यामुळे मुमताजला अनेक गंभीर आजार झाले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहांने आणखी ८ लग्ने केली.

कदाचित पुर्वी राजांना त्यांच्या हरममध्ये अनेक राण्यांना ठेवण्याचा छंद असावा त्यामुळेच त्याकाळी राजा अनेक लग्ने करत असावेत. त्याकाळी ज्या राजाला जास्त मुले तो जास्त शक्तीवान असे समजले जायचे. तसेच ज्या राजाच्या जास्त पत्नी असतील त्याचे पुरुषत्व जास्त असे देखील मानले जायचे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !