कुठलाही बिझनेस सुरु करायच्या आधी तो नीट प्लॅन करुन सुरु केला तर भविष्यात त्यामुळे नुकसान होत नाही. त्यामुळेच कोणताही बिझनेस सुरु करण्यापुर्वी त्याबद्दलची संपुर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेती बद्दल सांगणार आहोत जी रुजवायला लागत नाही. तसेच ती तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर पण घेऊ शकता. हा एका औषधी शेतीता व्यवसाय आहे.
लोकांना रासायनिक गोष्टींपेक्षा नैसर्गिक गोष्टी वापरायला जास्त आवडतात मग ते खाद्य पदार्थ असो वा कोणती औषधे. नैसर्गिक गोष्टींना मागणी जास्त असल्यामुळे त्यांना भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे औषधाची शेती हा एक उत्तम व्यवसाय असु शकतो. या व्यवसायामध्ये नफा भरपुर होण्याची शक्यता असते. शिवाय औषधी वनस्पतींसाठी जास्त जागेची किंवा मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज भासत नाही.
या गोष्टींपासुन करु शकता शेती – तुळस, लिकोरिस, कोरफड यांसारख्या हर्बल वनस्पती कमी वेळात तयार होतात. तसेच त्या वनस्पती छोट्या कुंड्यांमध्ये तयार होतात. या औषधांची शेती करण्यासाठी तुम्हाला काही हजार रुपयेच लागतात. पण कमाई मात्र तुमची लाखाच्या घरात होते. सध्या देशात अशा अनेक औषधाच्या कंपन्या आहेत ज्या शेती खरेदी करण्याच्या कॉण्ट्रॅक्ट घेतात. ज्यामुळे कमाई चांगली होती.
३ महिन्यात ३ लाखांची कमाई – तुळशीचे झाड हे धार्मिक दृष्ट्या पवित्र मानले जाते. पण औषधी वनस्पती म्हणुन देखील तुळशीपासुन कमाई केली जाऊ शकते. तुळशीचे अनेक प्रकार आहेत त्यातीलच जिनसे यूजीनोल आणि मिथाईल सिनामेट हे देखील आहेत. त्यांच्या पासुन कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर औषध बनवले जाते. १ हेक्टरवर तुळशीची शेती करण्यासाठी १५००० रुपये खर्च होतात. पण ३ महिन्यानंतर ही शेती ३ लाखांपर्यंत विकली जाते.
या कंपन्यांशी संलग्न होऊन करता येते कमाई – पतंजलि, डाबर, वैद्यनाथ यांसारख्या आर्युवेदीक औषधे बनवणाऱ्या कंपन्या तुळशीचे शेत कॉण्ट्रॅक्ट फार्मिंगवर घेतात. तसेच तुळशीच्या बिया आणि तेलाचा सुद्धा मोठा बाजार आहे. तुळशीच्या तेलाचे व बियांचे रेट रोज बदलत असतात.
औषधी वनस्पतींची शेती करताना भविष्य़ात कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. लखनऊ मधील सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ मेडिसिनल एंड एरोमैटिक प्लांट (सीमैप)मध्ये या शेतीसाठी ट्रेनिंग दिले जाते. या माध्यमातुन औषधी कंपन्या कांट्रेक्ट साइनसुद्धा करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !