गेल्यावर्षीच मोटर वाहन अधिनियम लागू करण्यात आले आहे. ज्यामुळे ट्रॅफिक पोलिस नवीन कायद्याला अनुसरून चलन कापतात. काही वेळेस ट्रॅफिक पोलिस अडवतात त्यामुळे घाबरून जायला होत. आता अशावेळी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण मोटार वाहन अधिनियमानुसार वाहन चालकांना सुद्धा काही अधिकार देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना पण काही बंधने आहेत जी त्यांना पाळावीच लागतात. चला तर मग जाणून घेऊ कोणते आहेत असे अधिकार.
ट्रॅफिक पोलिस वाहन चालकांकडून काय मागू शकतात?
जर तुम्हाला कोणत्या ट्रॅफिक पोलिसांनी अडवले तर सर्वात आधी तो तुमच्याकडे तुमचे ड्राईव्हींग लायसन मागतो. त्यामुळे लायसन नेहमी सोबत ठेवावे. त्याशिवाय काही आवश्यक कागदपत्र सुद्धा सोबत ठेवावेत. त्याचबरोबर परिवहन मंत्रालयाच्या १७-१२-१८ ला जारी केलेल्या आदेशानुसार Digilocker किंवा mParivahan app मधील कागदपत्रांना सुद्धा मान्यता असते. जर तुम्ही पोलिसांना मोबाईल मध्ये सेव असलेले कागदपत्रांचे फोटो दाखवलात तरीसुद्धा ते मान्य असते.
यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश असतो.
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पॉल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUC), ड्राइविंग लाइसेंस, कार इंश्योरेंस पॉलिसी डॉक्यूमेंट –
ट्रॅफिक पोलिसांनी जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही वरील कागदपत्रांची ओळख त्यांना करून देऊ शकतात.
जर तुम्ही ओवर स्पेलिंग किंवा रेड लाईट जम्प यांसारख्या नियमांचे उल्लंघन केले असल्यास ट्रॅफिक पोलिस तुमचे वाहन सिज करू शकतात. ट्राफिक पोलीस अधिकाऱ्यास तुमच्या वाहनाचे लायसन्स जप्त करण्याचा अधिकार आहे. लायसन जप्त केल्यावर त्याची पावती तुम्हाला मिळते. वाहन चालवताना जर तुम्ही सीमित मात्रे पेक्षा जास्त दारू प्याला असाल किंवा कोणत्याही प्रतिबंधित ड्रगचे सेवन केले असल्यास तुम्हाला बिना वॉरंट अटक केली जाऊ शकते.
तुमचे अधिकार कोणते ?
जर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी आढळल्यास तुम्ही त्यांच्याकडे त्यांचे ओळखपत्र मागू शकता. तुम्ही त्यांचा बेल्ट नंबर किंवा नावाची नोंद करून घेऊ शकता. त्यांच्याकडे बेल्ट नसल्यास आयडी कार्डची मागणी करू शकता. या सर्व गोष्टींची मागणी केल्यावर ते दाखवताना ट्रॅफिक पोलिसांनी जर त्यास नकार दिला तर तुम्ही त्या पोलिस अधिकाऱ्यास तुमचे खरे कागदपत्र दाखवण्यासाठी नकार देऊ शकता.
मोटर वेहिकल ऍक्ट कलम १३० नुसार एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला तुमचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले तर त्यास फक्त लायसन दाखवावे. बाकी कागदपत्र दाखवायचे की नाही हे तुमच्या मनावर अवलंबून असते. कागदपत्रांची मागणी करणारा पोलिस अधिकारी हा युनिफॉर्म मध्ये असणे आवश्यक आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने तुमचे लायसन्स जप्त केल्यास त्याच्याकडे त्या बदल्यात पावती मागण्याचा अधिकार वाहनचालकाकडे असतो. जर तुम्ही गाडीमध्ये बसला असाल तर पोलीस तुमच्या गाडीला क्रेन द्वारे खेचू शकत नाही.
तपासादरम्यान जर ट्राफिक पोलीस अधिकाऱ्याने तुमच्यासोबत गैरवर्तन केल्यास त्याबद्दलची तक्रार तुम्ही जवळील पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन करू शकता. पोलीस अधिकाऱ्याकडे जर सरकारी पावती बुक किंवा चालन मशीन असेल तरच तो तुमच्याकडून पावती कापू शकतो. तो पोलिस अधिकारी सब इंस्पेक्टर किंवा त्याच्यावरील रॅंकधारक असल्यास त्यावेळेस तुम्ही चलनाची फी जमा करू शकता. तपासणीदरम्यान पोलीस अधिकारी तुम्हाला कार बाहेर येण्याची जबरदस्ती करू शकत नाही किंवा जबरदस्तीने तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही.
ट्रॅफिक चलनात हे तपासून पहा – एखाद्या पोलिस अधिकारी तुमच्या विरोधात ट्रॅफिक चलान कापले तर पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ट्रॅफिक नियम उल्लंघनाचे संबंधित माहिती तपासून घ्या. कोर्टाचे नाव आणि ती केस कोणत्या कोर्टात नोंद केली जाऊ शकते हे हे जाणून घ्यावे. वाहन ट्रायल च्या वेळी कोण कोणते कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे याबाबतची माहिती सुद्धा माहित असणे आवश्यक आहे.
या गोष्टी ट्राफिक पोलिसांसोबत करू नयेत – पोलिसांनी गाडी अडवल्यास गाडीचे इंजिन बंद करावे, गाडीमधून खाली उतरू नये, गाडीची काच खाली घेऊन शांत डोक्याने पोलिसांसोबत बोलावे. पोलिस अधिकारी हा सुद्धा एक माणूस असतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. भर दुपारी, पावसात किंवा कडाक्याच्या थंडीत ते रस्त्यात उभे राहून त्यांचे काम करत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करून त्यांच्याशी नम्रतेने व्यवहार करावा. कदाचित तुम्ही त्यांच्याशी केलेल्या चांगल्या वर्तनामुळे ते फक्त चेतावणी देऊन तुम्हाला सोडू शकतात. शक्य असल्यास पोलीस अधिकाऱ्यास सत्य स्थिती सांगून कोणती चूक झाली असल्यास त्याबदली माफी मागा. वाहतुकीचा प्रत्येक नियम पाळावा. प्रत्येकाने जर असे नियम तोडले तर काय होईल ही गोष्ट ध्यानात घ्यावी. नियम हे आपल्या फायद्यासाठी बनवलेले असतात त्यामुळे त्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
पोलिस अधिकारी तुम्हाला कारण नसताना अडवू शकतो का ?
याचे उत्तर आहे ‘हो’ . जरी तुम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसेल तरी पोलीस अधिकारी तुम्हाला मध्येच थांबवून तुमच्याकडे कागदपत्र मागू शकतो.रस्त्याचे संरक्षण करणे आणि संभावित दुर्घटना रोखणे हे पोलीस अधिकाऱ्याचे काम आहे. त्यामुळे कोणतेही गोष्ट चुकीची जाणवल्यास ती रोखण्याचा त्याला अधिकार आहे.
ट्रॅफिक पोलिसांना वाहनाची चावी जप्त करण्याचा अधिकार आहे का ?
मोटर व्हेईकल अॅक्ट १९३२ मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, असे करणे गैरकानुनी आहे. ट्रॅफिक पोलिस जबरदस्ती तुमच्या गाडीची चावी घेऊ शकत नाहीत. कोणत्याही रँक वरील पोलीस अधिकाऱ्यास हा अधिकार दिला गेलेला नाही.