Headlines

बॉबी देओल सोबत हॉट सीन करते वेळी अशी झाली होती हालत, आश्रम मधील अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, खुलासा वाचून हादरून जाल !

२७ जानेवारीला बॉलिवु़ड अभिनेता बॉबी देओल ने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. बॉबी देओल सध्या त्याच्या आश्रम या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसिरीजमध्ये बॉबीने त्याची को-स्टार त्रिधा चौधरी सोबत भरपुर इंटीमेट सीन्स दिले. मात्र त्रिधासाठी हे सोप्पे नव्हते.

कारण बॉबी देओल एक सुपरस्टार आहे त्यामुळे त्रिधाला बॉबीसोबत इंटीमेट सीन्सचे चित्रिकरण करणे थोडे अवघडल्या सारखे झाले होते. ते इंटीमेट सीन्स करताना तिची काय हालत झाली होती याबाबत तिने एका इंटरव्हयु मध्ये सांगितले. त्रिधाने सांगितले कि लोकांना पडद्यावर बघताना ते खरेखुरे आहे असेच वाटते. पण तसे मुळीच नसते.

त्रिधाने पुढे सांगितले कि इंटीमेट सीन्स शुट करते वेळी बॉबी देओलने तिची खुप मदत केली. शुटिंग पुर्वी त्यांनी सेटवर चांगले वातावरण तयार केले. त्यामुळे माझे अवघडलेपण निघुन गेले. त्यामुळेच बॉबी देओल आणि त्रिधा चौधरीची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडली. त्रिधाने सांगितले की तिला या वेबसिरिजची ऑफर स्वत: त्या सिरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिली होती.

प्रकाश झा यांनी त्रिधाची प्रोफाइल पाहिली होती त्यानंतर त्यांनी तिला या सिरिजबद्दल विचारले. त्रिधाने आश्रम या वेबसिरिज साठी ओडिशन दिली नव्हती. तिची प्रोफाइल प्रकाश झा यांना आवडल्यामुळे त्यांनी लगेच तिला या सिरीजची ऑफर दिली. त्रिधा चौधरी बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितला तिची आयडॉल मानते. तिला माधुरी दिक्षितप्रमाणेच इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचे आहे.

इंटरेव्हयुमध्ये त्रिधाने सांगितले कि तिला बोल्ड सीन्स करायला कोणताच प्रोब्लेम नाही मात्र ती ब्रॅंड आणि बॅनर बघुनच काम करते. कुठल्याही चित्रपटात काम करण्यापुर्वी ती आधी बघते की त्या चित्रपटाचा डायरेक्टर कोण आहे. चित्रपटातल्या तिच्या को-स्टारचे नेचर कसे आहे. त्रिधाचे म्हणणे आहे कि तिला माहित आहे की सगळेच त्या चित्रपटाचा हिस्सा आहेत पण ती पण तिचा जॉब करत असते, निर्माता त्यासाठी मला पैसे देतात.

त्रिधा सांगते कि आश्रम मधले तिचे बोल्ड सीन्स काही जणांना आवडले तर काहींनी त्याचा विरोध सुद्धा केला. त्यामुळे विरोध करणाऱ्यांना मला एवढेच सांगावेसे वाटते कि त्यांनी स्वत: एकदा कॅमेऱ्यासमोर यावे. तिथे काम कसे होते या गोष्टी समजुन घ्याव्यात. त्यानंतरच कोणावर टिका करायची असेल ती करावी.

त्रिधा चौधरी ही मुळची पश्चिम बंगालची आहे. तिने तिच्या करियरची सुरुवात 2013 मध्ये बंगाली फिल्म ‘मिशौर रोहोस्यो’ मधुन केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये तिने स्टार प्लसच्या ‘दहलिज’ या मालिकेतुन टिव्ही क्षेत्रात पदार्पण केले. २०१७ मध्ये त्रिधाने आरिफ जकारियासोबत पहिली वेब सीरीज ‘स्पॉटलाइट’ मध्ये काम केले. अनोखा अंदाज आणि सौंदर्य व अभिनयामुळे त्रिधा चौधरीने कोलकत्ता टाइम्स फ्रेश हा अवॉर्ड जिंकला होता. २०२० मध्ये त्रिधाने आश्रम या वेबसिरिज व्यतिरिक्त बंदिश बॅंडिट या वेबसिरिजमध्ये सुद्धा काम केले होते.

बोल्ड सिन्स देण्याची त्रिधाची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिने स्पॉटलाइट या सिरीजमध्ये अनेक बेडरुम सीन्स दिले होते. वेबसीरीज आणि बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त तिने ‘सूर्या vs सूर्या’ आणि ‘मनसुकु नाचिंदी’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. तिच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्या येत्या काही दिवसात ती रणबीर कपूर आणि संजय दत्त सोबत शमशेर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वाणी कपूर, रोनित रॉय आणि इरावती हर्शे सुद्धा दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !