लग्नासारखा सुंदर क्षण सारखा सारखा आयुष्यात येत नाही त्यामुळे तो क्षण प्रत्येकजण आठवणीत राहिल असा घालवतात. पण पाकिस्तानातील एका महिलेला नवरी बनण्याचा इतकी हौस आहे की ती दर शुक्रवारी नवरी बनते. पंजाब प्रांतातील लौहोर येथे राहणारी हीरा जीशान ही ४२ वर्षांची आहे. हिरा जीशान गेल्या १६ वर्षांपासुन दर शुक्रवारी नव्या नवरीप्रमाणे सोळाशृंगार करुन सजते. असे करण्यामागेचे कारण जेव्हा तिला विचारले गेले तेव्हा भयानक गोष्ट समोर आली.
हिराने सांगितले कि १६ वर्षांपुर्वी तिची आई खुप आजारी होती. त्यामुळे तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले होते. हिराचे लग्न व्हावे अशी तिच्या आईची इच्छा होती. त्यावेळी माझ्या आईला ज्या व्यक्तीने रक्तदान केले त्याच्यासोबतच माझे लग्न ठरवण्यात आले. आईच्या खुशीसाठी हिरानेसुद्धा लग्नाला होकार दिला. त्यानंतर हॉस्पिटलमध्येच हिराचे लग्न लावण्यात आले. तिची पाठवणी एका रिक्षा तुन केली.
https://www.facebook.com/DailyPakistan.OfficialPage/videos/395838041516045
लग्नावेळी आई आजारी असल्यामुळे हिराला नवरीप्रमाणे शृंगार करता आला नव्हता. त्यानंतर काही दिवसांत तिच्या आईचे निधन झाले. आईच्या सोडुन जाण्यामुळे हिराच्या मनाला धक्का बसला आणि ती डिप्रेशनची शिकार झाली. त्यावेळी ती स्वत:सुद्धा आई झाली.
मात्र तिची दोन्ही मुले जन्मताचा मेली. त्यामुळे तिला अजुनच जबर धक्का बसला. त्या डिप्रेशन मधुन बाहेर पडण्यासाठी तिने दर शुक्रवारी नवरी प्रमाणे नटणे सुरु केले. असे केल्यामुळे ती डिप्रेशनमधुन बाहेर पडली आणि आता आनंदाने जीवन जगत आहे.
हिराचे म्हणणे आहे कि, तिला नवरीप्रमाणे नटल्यामुळे खुप बरे वाटते. तिचे एकटेपण दूर होते. त्यामुळेच ती गेली १६ वर्षे शुक्रवारी नवरीप्रमाणे नटते. हिराला एकुण ४ मुलं आहेत. तर तिचे पती लंडनला राहतात. ती तिच्या मुलांसोबत पाकिस्तानमध्ये राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !