स्वतःची बायको सोडून नवऱ्याला शेजारची बाई का आवडते ? कारण जाणून थक्क व्हाल !

bollyreport
3 Min Read

स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या ताटातले पदार्थ गोड लागतात अशी एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ म्हणजे आपल्याला आपल्याकडे असलेल्या स्वतःच्या गोष्टींपेक्षा जास्त लगाव दुसऱ्यांच्या गोष्टींवर असतो. आपल्याला आपल्याकडील वस्तूंपेक्षा बाजूच्या व्यक्ती कडील वस्तू अधिक प्रिय असतात. ही एक मानवी सवय आहे. ही सवय अधिक तर नवऱ्या मध्ये लागू होते.

जोपर्यंत मुलाचे लग्न झालेले नसते तोपर्यंत त्या मुलाला त्याची होणारी बायको एका परी प्रमाणे भासते. इच्छित मुलगी बायको म्हणून मिळावी यासाठी मुलं अतोनात प्रयत्न करतात. मात्र एकदा का लग्न झाले की मग त्या मुलांचे त्यांच्या बायकोतील इंटरेस्ट कमी होत जातो. जसजसा वेळ पुढे जात जाईल तशी मुलांना त्यांची बायको घरातले डाळ भात आणि शेजारची बाई मलाई कबाब वाटते.

ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात त्या मिळवण्याची इच्छा आपल्या मनात तीव्र असते. जी गोष्ट आपल्याकडे पहिल्यापासून आहे त्याची कदर आपल्याला नसते हा नैसर्गिक नियम आहे. आणि पुरुष या नियमाचे नीट पालन करतात. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे पती त्यांच्या पत्नीला रोज रोज पाहून कंटाळतात.

जोपर्यंत जगताना त्यांच्या आयुष्यात काही नवे मिळत नाही तोपर्यंत ते इतरत्र काहीतरी एडवेंचर चा शोध घेतात. पतीची ही सवय मोडण्यासाठी पत्नी यांचा लुक बदलून नवीन लोक ट्राय करावा किंवा काहीतरी रोमँटिक गोष्टी करून पतीची ती सवय मोडावी.

यामागील अजून एक प्रमुख कारण म्हणजे पत्नी खूप जास्त भांडखोर असेल तर देखील पती असा वागू शकतो. पत्नीची रोज रोजची किरकिर ऐकून पती कंटाळतो. त्यामुळे पतीला इतर महिलांमधील चांगुलपणा आणि स्वतःच्या पत्नीतील वाईट पणा प्रकर्षाने जाणवतो. ही एक मानसिक प्रक्रिया आहे. या कारणामुळे पती मनाने त्याच्या पत्नीवर कमी व दुसऱ्या बाईवर जास्त प्रेम करतो.

ही एक सर्वसाधारण बाब आहे जेव्हा तुमच्या शेजारील स्त्री तुमच्याशी बोलते त्यावेळी ती तुम्हाला प्रेमळच वाटते. पती ही गोष्ट मनाला लावतात आणि परस्त्रीला स्वतःचे मन देऊन बसतात. मात्र पुरुषांना ही गोष्ट ठाऊक नसते की शेजारील स्त्रिया त्यांच्या घरात त्यांच्या पतीशी कसा व्यवहार करतात. कदाचित या स्त्रिया देखील त्यांच्या पतीशी त्यांच्या पत्नी प्रमाणेच व्यवहार करणाऱ्या असू शकतात.

तर मित्रांनो या काही कारणांमुळे पती त्यांच्या पत्नीला सोडून शेजारील स्त्रीकडे आकर्षित होतात. जर तुम्हाला तुमच्या पतीची ही सवय सुधारायची असेल तर वर सांगितलेल्या कारणांचे नीट निरीक्षण करा आणि तसे आढळल्यास त्यावर योग्य ते उपाय शोधा. तुमचा पती तुमच्या हातातून निसटून जाईल अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका.

तुमच्या पतीच्या मनात काय आहे ते नीट ओळखा. त्याचा नीट सांभाळ करा त्याची काळजी घ्या. ज्या गोष्टी त्याला हव्या आहेत त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करा. वेळोवेळी तुमचा लुक व तुमची हेअर स्टाईल बदलत राहा. थोडे मॉर्डन बनवण्याचा प्रयत्न करा. चांगले कपडे परिधान करा. रोमॅण्टिक अंदाजात बोलत जा.

मग पहा कसा तुमचा पती कायम तुमच्याकडेच राहील. नेहमी लक्षात ठेवा पुरुषांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही नवीन हवे असते. त्यामुळे तुम्ही स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही जिमला जा, फिट रहा आणि योग्य डायट घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.