डायबेटिस, त्वचेचे रोग यांसारखे आजारांसाठी आपण डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेतो. यात आपला भरपूर पैसा वाया जातो शिवाय काही वेळेस त्या औषधाने मध्ये असलेल्या केमिकल मुळे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे अशा आजारांसाठी घरगुती उपाय केल्यास आपला पैसा खर्च होणार नाही शिवाय त्यावर नैसर्गिक रित्या उपचार होतील. आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेली वस्तू म्हणजे हिंग. यांचे आज आम्ही तुम्हाला आपल्या शरीरासाठी अनेक फायदे कसे आहेत ते सांगणार आहोत. जेवण करताना फोडणीला उत्तम स्वाद यावा यासाठी त्यात हिंग घालतात. यामुळे जेवण सुद्धा रुचकर बनते. हिंगाचा वापर विशेषतः डाळ आणि भाजी मध्ये केला जातो.
स्वाद आणि सुगंधासाठी हिंगाचा वापर प्रामुख्याने केला जातो. डाळीमध्ये फोडणीला हिंग घातले की डाळीला तडका मिळतो तर भाजीत घातल्यावर भाजीचा सुगंध उत्तम रित्या दरवळतो. हिंग साधारणतः गडद लाल किंवा पिवळसर रंगाचे असते. मात्र या हिंगाचा उपयोग फक्त जेवणा पुरताच मर्यादित नसून त्याचे काही औषधी गुणधर्म देखील आहेत.
1. अपचनावर गुणकारी – अपचन झाल्यावर हिंगचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. पोटात गॅस झाला असल्यास तो देखील दूर करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. अपचन झाल्यावर एक कप पाण्यात एक चिमूटभर हिंग घाला आणि त्याचे सेवन करा.
2. श्वासा संबंधित – श्वासा संबंधित समस्येत देखील हिंगाचा वापर केला जातो. जर तुमच्या छातीत कळा येत असतील त्या वेळेस हिंगाचे सेवन केल्यास त्या कळा थांबतात.
3. मासिक पाळी – मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांच्या पोटात भरपूर दुखते. त्या वेळी पोटात येणाऱ्या कळा या असह्य असतात. त्यावेळेस पाण्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून प्यायल्यास पोटाला आराम मिळतो व पोटात येणाऱ्या कळा कमी होतात.
4. त्वचेसाठी उपयोगी – हिंगामध्ये अॅंण्टी इंफ्लेमेटरी घटक असतात. त्यामुळे याचा उपयोग त्वचे संबंधित समस्या दूर करण्यास होतो. त्वचेत जळजळ होत असल्यास त्या ठिकाणी हिंग लावल्यावर ती जळजळ थांबते व त्वचेला थंडावा मिळतो.
5. दुखणी दूर करण्यासाठी – हिंगाचा वापर अनेक प्रकारची दुखणी दूर करण्यास देखील केला जातो. तुम्हाला जर पोट दुखी किंवा डोकेदुखी होत असल्यास हिंग थोडे गरम करून त्याचा लेप लावावा. जा तुमच्या दात दुखत असेल तर हिंगा मध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका व दुखऱ्या दाताला ते लावा.
6. सर्दी आणि खोकल्यासाठी – या शिवाय सर्दी खोकला झाल्यास देखील हिंगाचा वापर केला जातो. हवामान बदलल्यास सर्दी-खोकला होणे सहाजिक आहे. त्यावेळी सर्दी झाल्यामुळे नाक बंद होते श्वास घेण्यास व बोलण्यास त्रास होतो. हिंगाचे पाण्याची वाफ घेतल्यावर सर्दी निघून जाते.
7. मधुमेहासाठी – हिंग डायबेटिस साठी सुद्धा फायदेशीर असते. जर तुम्हाला डायबेटीस असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने हिंगाचे सेवन करावे.
वरील सर्व प्राथमिक आयुर्वेदिक उपचार आहेत, तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट्स द्वारे काळवा.