Headlines

जेवल्यानंतर खा फक्त या ३ गोष्टी, ब्लड प्रेशर, र’क्ताची कमी, अपचन यासारख्या आजारातून होईल कायमची मुक्ती !

आजकालच्या धावत्या जीवनशैलीत लोक गोष्टी कशा पटपट होतील याकडे अधिक लक्ष देतात. मग यासाठी पायऱ्यांऐवजी लिफ्टचा वापर करतात.. जवळ कुठे जायचे असेल तरी गाडीचा वापर करतात. एवढेच काय तर खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा शॉर्टकट वापरले जातात. त्यामुळे कित्येकदा अपचनाचा त्रास होतो. अशावेळी मग लगेच मेडीकलमध्ये धाव घेऊन तात्पुरत्या उपायासाठी औषधं आणुन ती खाल्ली जातात.

पण कितीही झालं तरी ते तात्पुरतं असल्यामुळे पुन्हा हा त्रास होतोच. शिवाय काही वेळेस स्वस्थ्य आणि फिट राहण्यासाठी योग्य आहार हा आवश्यक असतोच. पण या शिवाय खाण्याची योग्य वेळ, कॉम्बिनेशन, आणि क्वालिटी या गोष्टीसुद्धा लक्षात घेणे आवश्यक असते. अनेकदा जेवण्यानंतर लोकांना गोड खाण्याची सवय असते. मग अशावेळी लोक गुलाबजाम, हलवा, किंवा अन्य मिठाईंचे सेवन करतात.

या सर्व सवयींमुळे तब्येत बिघडु शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या जेवणानंतर सेवन केल्यास तुमच्या पोटाच्या समस्या, र*क्ताची कमी, तोंड येणे यांसारख्या समस्येतुन सुटका मिळवण्यासाठी मदत होईल.

जेवल्यानंतर खडीसाखर खाण्याचे फायदे – शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा कमी झाल्यास र*क्त सुद्धा कमी होते. यामुळे अशक्तपणा येतो. यामुळे जर शरीरातील र*क्ताची कमी भरुन काढण्यासाठी खडीसाखरेचे नियमित सेवन करावे. खडीसाखरेचे सेवन केल्यास शरीरातील पचनतंत्रसुद्धा योग्यरित्या काम करते. यामध्ये काही पाचक गुण असतात.

त्यामुळे खडीसाखरेचे सेवन केल्यास अन्न नीट पचते. खडीसाखर र*क्तदाब नीट करुन डायबेटीसवर सुद्धा नियंत्रण ठेवते. खडीसाखर घसा साफ करुन घशातील खवखवसुद्धा नीट करते. थंडीच्या दिवसात खडीसाखरेची गोडी ही अमृतासमान असते. जेवल्यानंतर खडीसाखरेचे सेवन केल्यास शरीरातील एनर्जीसुद्धा वाढते.

जेवल्यानंतर बडीशेपचे सेवन करावे – जेवल्यानंतर बडीशेप खाल्यास बडीशेपचे रासायनिक गुण पोटातील जळजळ कमी करतात. उलटीसारखे होत असल्यास बडीशेप खाणे फायदेशीर ठरते. बडीशेपचे रासायनिक गुण हे शरीरातील फ्रि-रेडीकल आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे र*क्त सुद्धा शुद्ध होते. शरीर निरागी ठेवण्यासाठी आवश्यक असे अनेक पोषक तत्व बडीशेपमध्ये असतात. बडीशेपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे स्मरणशक्ती चांगली होते.

बडीशेप मध्ये कॅल्शिअम, सोडीयम, आयन, आणि पोटॅशिअम यांसारखी खनिजे असतात. उपाशीपोटी बडीशेपचे सेवन केल्यास र*क्तशुद्ध होते. तोंडाला दुर्गंधी येत नाही, त्वचेला तेज येते. यामुळे नियमित दिवसातून तीन ते चार वेळा अर्धा चमचा बडीशेप चे सेवन करावे. बडीशेप खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी सुद्धा तीक्ष्ण होते. तुम्ही खडीसाखर सोबत सुद्धा बडीशेप खाऊ शकता.

जेवल्यानंतर वेलची खाण्याचे फायदे – वेलची मध्ये एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यास मदत होते. वेलची मुळे शरीरातील युरिन शरीराबाहेर योग्य मात्रेत काढण्यास मदत होते. वेलची मध्ये अनेक आरोग्यासंबंधी सुद्धा गुण असतात त्यामुळे वेलचीचे सेवन केल्यास पोटासंबंधी समस्या किंवा पोटात गॅस होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

याशिवाय पोटात होणारे इन्फेक्शन, पोटदुखी यांसारख्या समस्या सुद्धा दूर होतात. वेलची तोंडातील खराब बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर ठेवण्यास मदत करते. यासोबतच दातां संबंधी आजार दूर करण्यास वेलचीचा वापर होतो. वेलची मुळे थुंकीत बॅक्टेरिया निर्माण होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.