Headlines

वजन कमी करायचंय तर जाणून घ्या या टिप्स, तुम्हाला सकाळी किती वेळ चालावे लागेल जाणून घ्या !

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सर्साइज करतात, वॉकला जातात. वॉकिंग करणे हा सर्वात सोप्पा उपाय आहे कारण तो आपण कधीही कुठेही करु शकतो. लोकांना जास्त व्यायाम करणे आवडत नाही त्यामुळे लोक पार्कमध्ये जाऊन वॉक करणे पसंत करतात. सध्या सर्वच वयोगटातील लोक वॉक घेणे पसंत करतात.

कारण तो सोप्पा उपाय आहेच शिवाय तो करण्यासाठी वेगळी अशी कोणती अरेंजमेंट करावी लागत नाही. वॉकमुळे ह्रदय स्वस्थ होते तसेच हाडे मजबुत होतात. याशिवाय मानसिक तणाव सुद्धा दुर होतो. तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर आम्ही तुम्हाला काही टीप्स देतो ज्यामुळे कमी दिवसात तुमचे वजन कमी होईल.

चालल्यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न तर होतात पण अन्य एक्सर्साइजच्या तुलनेत त्यांचा वेग खुप कमी असतो. त्यामुळे यासाठी तुम्हाला जरा जास्त मेहनत करावी लागेल. फक्त १५ मिनिटे चालल्यामुळे काही होणार नाही. तुम्हाला जर तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी करायच्या असतील तर रोज कमीत कमी ४० ते ५० मिनिटे चालावे. तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होणे हे तुमच्या वजन आणि इंटेस्टीवर अवलंबुन असते.

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर सुरुवातीला तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल. सुरुवातीले काही आठवडे ३० मिनिटे वॉक घ्यावा. त्यानंतर पुढचे दोन आठवडे त्याहुन जास्त १० मिनिटे वॉक घ्या. हे चॅलेंज तुम्ही वेळेसोबत स्वत:ला सुद्धा देऊन बघा. त्यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी होईल.

सकाळी वॉक घेणे ठरेल फायदेशीर – व्यायाम करण्यासाठी कोणता विशिष्ठ ठराविक वेळ असा नसतो. तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल किंवा शारीरीक रित्या फिट राहयचे असेल तर चालत जाणे पसंत करा. इंटरनेशनल जर्नल ऑफ एं*डो*क्रि*नो*लॉ*जी मध्ये सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार दिवसा व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी कधीही चांगले असते. सकाळी सकाळी उपाशी पोटी चालल्यामुळे वजन कमी होते कारण त्यावेळी आपले शरीर कॅलरी बर्न करण्याच्या मोडमध्ये असते. त्यामुळे सकाळी वॉक केल्यामुळे फॅट बर्न होते.

चालते वेळी खांदे फिरवा – चालते वेळी खांदे फिरवल्यामुळे तुमचे वर्कआऊटसुद्धा होईल. चालतेवेळी खांदे फिरवल्यामुळे ५ ते १० टक्के कॅलरी कमी होते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर ९० डिग्री अॅंगल मध्ये खांदे फिरवा.

खाण्यापिण्यात सावधगिरी बाळगा – फक्त चालल्यामुळे वजन कमी होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे. व्यायाम करण्यापुर्वी आणि झाल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टींचे सेवन करता त्यामुळे वेटलॉस होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.