Headlines

आई आणि परी म्हणत आहेत, “अपने पास बोहोत पैसे है” !

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे.

श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी तर सगळ्यांना भावतेच आहे पण या मालिकेत अजून एक जोडी आहे जी प्रेक्षकांची अतिशय आवडती आहे आणि ती जोडी म्हणजे परी आणि नेहाची. आई आणि मुलीची हि गोड जोडी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय. नुकतेच पोस्ट केलेले नेहा आणि परीचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मालिकेत नेहा आणि परी या दोघींचा ‘अपने पास बोहोत पैसे है’ हा डायलॉग अतिशय गाजला आणि हाच डायलॉग लिहिलेलं टीशर्ट दोघींनी फोटोज मध्ये घातलेलं दिसतंय. हे फोटोज खूपच कमाल असून त्यावर नेटिझन्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आई आणि परीची हि सॉल्लिड टीम सगळ्यांची फेव्हरेट आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !