Headlines

कृष्णा आणि रायाचं खुळलेलं प्रेम नेमकं आता कोणतं वळण घेणार? मन झालं बाजिंद अनोख्या वळणावर !

झी मराठीवर सुरु असलेल्या अनेक मालिका सध्या लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातील एक बाजिंद प्रेमकथा म्हणजे मन झालं बाजिंद या मालिकेची कथा. सुरुवातीला ही मालिका फ्लॉप ठरणार असं अनेकांकडून बोलण्यात आलं होतं. परंतु अनेक नवीन कलाकार आणि उत्तम कथानक असलेली ही मालिका थोड्या कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

यातील राय आणि कृष्णा ही दोन मध्यवर्ती भूमिका असलेली पात्रे आहेत. कृष्णाचा फॅक्टरीमध्ये मशीनचा शॉक लागल्याने तिचा हात निकामी होतो आणि या काळात राया कृष्णाची वेळोवेळी मदत करतो. हे पाहून रायाची आई रायाला दुसरं लग्न करण्यासाठी देखील सांगते. अनेक चढउतार, राग, द्वेष यातून गेलेलं राया आणि कृष्णाचं प्रेम अखेर खुललं आहे. दोघे ही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. सध्या मालिकेत त्यांच्या प्रेमाचे रंग बहरताना दिसत आहेत.

राय कृष्णाच्या बाजिंद प्रेमाचं एक खास गाणं सध्या तयार करण्यात आलं आहे. अलवार आलं…. असं या गाण्याचं नाव आहे. झी मराठीने या गाण्याची झलक आपल्या इंस्टाग्राम पेजवरून दिली आहे. २० फेब्रुवारी रोजी रविवारी झालेल्या एका तासाच्या विशेष भागात हे गाणं दाखवण्यात आलं. या गाण्यात राया आणि कृष्णाच्या प्रेमाचे काही क्षण दाखवण्यात आले आहेत.

वाघोबा प्रॉडक्शनच्या युट्युब पेजवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. वाघोबा प्रोडक्शन हे “मन झालं बाजिंद” या मालिकेची निर्मिती संस्था आहे. पद्मनाभ गायकवाड आणि ऋतुजा पांडे या गायकांनी हे गाणं गायलं आहे. राया आणि कृष्णाने देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या या गाण्याची एक छोटी झलक पोस्ट केली आहे.

कृष्णा आणि रायाचं खुळलेलं प्रेम नेमकं आता कोणतं वळण घेणार? कृष्णाच्या जीवावर बेतणाऱ्या घटनांना रायाच्या प्रेमाने पूर्णविराम लागणार का? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेलं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !