Headlines

‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीचा आणि या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, जाणून घ्या !

अनेक विविध कलाकार सध्या लग्न, साखरपुडा समारंभांमध्ये व्यस्त असताना दिसत आहेत. आपला हक्काचा जीवनसाथी त्यांना भेटला असून ते आपल्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याकडे आले आहेत. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांपर्यंत ते आनंदाची बातमी पोहचवतात. तर आज अशाच अजून एका कलाकार जोडीविषयी आपण बोलणार आहोत ज्यांनी साखरपुडा झाल्याचा फोटो शेयर करत सर्वांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे या कलाकार जोडीचं नाव आहे. विराजस कुलकर्णी याने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेता विराजस कुलकर्णी शिवानी रांगोळे एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर दोघंही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करायला कधीच कमी पडत नाहीत.

अनेकवेळा एकमेकांसोबतचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर दोघे ही शेअर करत असतात. याशिवाय अनेक ठिकाणी हे दोघे ही एकत्र देखील दिसले आहेत. शिवानीने विराजससोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विराजस आणि शिवानी एकत्र उभे आहेत आणि ती तिच्या बोटांमधील अंगठी दाखवताना दिसत आहे. सोबतच तिनं म्हटलं आहे की, Put a ring on it! #2022 #virani…या दोन ओळीच्या कॅप्शन वरून तर त्यांचा साखरपुडा झाल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. नव्या वर्षात त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. आता ही कलाकार जोडी लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

विराजस आणि शिवानी यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, विराजस कुलकर्णी हा एक चांगला लेखक व दिग्दर्शक आहे. त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले आहे. परंतु झी मराठीवरील “माझा होशील ना” या मालिकेतील आदित्य या पात्राने त्याला ओळख मिळवून दिली. या भूमिकेमुळे तो अधिक प्रसिद्ध झाला. विराजस कुलकर्णी हा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा तो मुलगा आहे.

शिवानी रांगोळे हिने अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. फुंतरू, जरा हटके व डबल सीट या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. स्टार प्रवाह वरील मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरवगाथा या मालिकेतील रमाबाई आंबेडकर यांची भूमिका गाजली होती. स्टार प्रवाह वरील “सांग तू आहेस ना” या मालिकेत देखील तिने काम केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !