Headlines

स्त्रिया नारळ का फोडत नाहीत ? जाणून घ्या त्या मागचे कारण !

हिंदू धर्मामध्ये नारळाला फार महत्व दिलेले आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही नारळ फोडून केली जाते. त्याचा उपयोग पूजा विधींपासून ते आहारात वापरण्यापर्यंत केला जातो. नारळाला फक्त धार्मिक महत्त्व नसून व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी देखील तो उपयोगी आहे. ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक थंड व खनिज संपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये कधीच महिला नारळ फोडत नाहीत. स्त्रियांना नारळ फोडण्यासाठी बंधन आहेत. परंतु स्त्रिया नारळ का फोडत नाहीत? यामागील कारण काय असेल ?

हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये नारळाला फार महत्त्व आहे. पूजेसाठी पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर बाजूंनी आंब्याची पाने लावून मधोमध नारळ उभा ठेवतात. शुभकार्यात पाहुणे मंडळींना नारळ देण्याची देखील पद्धत आहे. भारतीय समाजात अनेक वेगवेगळ्या चालीरीती परंपरा आहे, या प्रत्येक परंपरेमागे काहीतरी गोष्ट आहे. पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा म्हणजे स्त्रियांनी नारळ फोडू नये. भारतीय स्त्रिया या स्वतःच्या हाताने कधीच नारळ फोडत नाही, नारळ फोडण्यासाठी हा नेहमी पुरुषांकडे दिला जातो.

शास्त्रानुसार नारळ हे एक फक्त फळ नसून ते एक बीज आहे, जे प्रजननक्षमतेशी संबंधित आहे. एक स्त्री बियाण्याच्या स्वरूपात मुलास जन्म देते, मग नारळाला देखील एक बीज असल्यासारखे मानले जाते तर ते बीज स्त्री स्वतः कसं तोडू शकेल, म्हणून स्त्रिया नारळ फोडत नाहीत. स्त्रियांनी जर का नारळ फोडला त्यांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि होणाऱ्या बाळावर दुःखाचा डोंगर कोसळतो, असं देखील मानला जातं. यामुळे स्त्रिया नारळ फोडत नाहीत व पूजा विधी झाल्यानंतर पुरुषांना नारळ फोडण्यास दिला जातो.

पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे नारळ हे कसे फळ आहे, या फळाला स्वयं विष्णू यांनी लक्ष्मीदेवीसाठी पाठवले होते. त्यामुळे या फळावर फक्त देवी लक्ष्मीचा अधिकार आहे आणि इतर कोणतीही स्त्री हे फळ फोडू शकत नाही. जेव्हा स्वतः देव विष्णू भूमीवर आले होते तेव्हा त्यांच्यासोबत तीन गोष्टी आल्या होत्या त्या म्हणजे लक्ष्मीदेवी, कामधेनु आणि नारळ; असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच महिलांना नारळ फोडू देत नाही नाहीतर विष्णुदेव नाराज होतात.

अनेकदा नारळाला श्रीफळ असं बोलताना आपण ऐकलं आहे. नारळ हे विष्णू आणि लक्ष्मीचे फळ आहे, ज्यामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश विराजमान आहेत. त्यामुळे नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते कारण या झाडाच्या सर्व अंगांचा वापर केला जातो. नारळाचा स्वतःचा एक वेगळा महत्व असून त्याच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. नारळामध्ये देवी देवतांचं वास्तव्य असतं. त्यामुळे नारळाला शुभ मानलं जातं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.