Headlines

या चित्रात लपला आहे एक मानवी चेहरा, १५ सेकंदात ओळखू शकला तर तुम्ही आहेत खूप जिनियस !

ऑप्टिकल इल्यूजन सध्या सर्वांच्या परिचयाचं झालं आहे. अनेक जण फारच तीक्ष्ण आणि चाणाक्ष असतात. फरक, कोडी पटापट सोडवतात. आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनसह कोड्यांचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये तुम्हाला एक चित्र दाखवले जाते. मग त्यात लपलेला कोणताही प्राणी शोधण्यास सांगितले जाते.

हा प्राणी त्या चित्रात अशा प्रकारे मिसळतो की तुम्हाला ते सहज दिसत नाही. तीक्ष्ण नजर आणि चाणाक्ष असणारेच ते त्वरित पाहू शकतात. आज आम्ही तुम्हाला असे एक कोडे विचारणार आहोत. हे कोडे थोडे अवघड आहे. पण तीक्ष्ण बुद्धी असणाऱ्यांना हे सोपे वाटू शकते. असे कोडे सोडवल्याने मेंदूलाही खूप व्यायाम होतो. यामुळे तुमचे मन अधिक तीक्ष्ण होते. चला तर मग बघूया तुमचा मेंदू किती वेगवान आहे.

या ठिकाणी या फोटोमध्ये जो प्राणी (कुत्रा) आहे त्यात एक मानवी चेहरा लपलेला आहे. हा व्हायरल फोटो पाहून अनेकजण संभ्रमात पडले आहेत. आता या प्राण्याच्या चेहऱ्यामध्ये मानवी चेहरा कुठे आहे हे तुम्हाला शोधायचे आहे.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात कुत्र्याचे स्केच तयार करण्यात आलेले हे चित्र १९ व्या शतकातील एका ट्रेड कार्डवरचे आहे. हे चित्र प्लेबझ या कोडे वेबसाईटवर पोस्ट केलेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे चित्र 1880 च्या दशकातील आहे. मात्र, या फोटोतील मानवी चेहरा शोधताना अनेकांना घाम फुटला आहे.

हे चित्र जर तुम्ही अगदी बारकाईने पाहिले असेल तर तुम्हाला या चित्रात तो मानवी चेहरा दिसेल. या चित्रात कुत्र्याच्या कानाजवळ हा मानवी चेहरा लपलेला दिसतोय. कुत्र्याचा कान हा त्या माणसाची टोपी आहे. यातील चेहरा पाहण्यासाठी आपल्याला मान ९०° कोनामध्ये करावी लागेल.


अनेकांनी या चित्रसंबंधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणाले या चित्रातील मानवी चेहरा शोधणे खूप अवघड झाले. तर काही जण म्हणाले, हे काम फारच सोपे होते.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !