Headlines

रानादा आणि पाठक बाई विवाह बंधनात, पहा त्यांच्या लग्नाचे खास फोटोज !

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेले राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पुण्यात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.

सकाळी त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली. दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्नात दोघेही पारंपरिक रुपात अतिशय सुंदर दिसले. नऊवारीत अक्षयाचे सौंदर्य खुलून आले आहे.

हार्दिक अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास लूक केला होता. अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत.

तर हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे. यांचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.

अक्षयाने लग्नात राणी कलरची नऊवारी परिधान केली आहे. या नऊवारीवर चंद्राकोर आहे. तिने गळ्यात ठुशी, चंद्रहार, नाकात नथ घातली आहे. या रुपात अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतही दिसत आहे.

हार्दिक-अक्षयाच्या लग्नाला इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रमंडळींनीही हजेरी लावली आहे. पुण्यात शाही थाटात त्यांचा लग्नसोहळा सुरू आहे.

दोघांच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा !