Headlines

मरणाच्या तोंडून परत आलेले ५ कलाकार !

आकस्मिक अपघातामुळे अनेकदा लोकांच्या जीवावर बेतलेल्या घटना आपण ऐकल्या आहेत, कधी चुकीमुळे तर कधी आकस्मिकरित्या. अनेकदा शूटिंगच्या वेळेस कलाकार स्टंट करत असताना अपघात होऊन कलाकार जखमी होतात वा काही वेळेस अपघात मोठा असल्यास गंभीर दुखापत ही होऊ शकते. हल्लीच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या अपघाताची घटना आपण ऐकली. शबाना आझमी यांची कार येणाऱ्या भरधाव ट्रकला धडकली आणि अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला त्यांना मुंबईतील एमजीएम हॉस्पिटल मध्ये भरती केले परंतु नंतर कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये त्यांना हलवण्यात आले. सध्या त्या आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांच्या म्हणण्यानुसार काळजी करण्यासारखी कोणतीही बाब नाही त्याचे आयसीयूमध्ये असल्या तरी सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. अपघाताचे व्हायरल झालेले फोटोज पाहून आपल्याला नक्कीच अंदाज येईल की किती भयानक अपघातातून शबाना आझमी वाचल्या.
कलाकारांच्या अपघाताच्या अशा कित्येक घटना आपण ऐकल्या आहेत. बरेच बॉलीवूडमधील कलाकार या अपघातांमुळे मृत्यूचा तोंडून परत आले आहेत. आज आपण पाहूया की कोण आहेत असे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जे मरणाच्या तोंडून परत आले आहेत.

सनी लियॉन – बेबी डॉल या नावाने प्रसिद्ध असलेल्या सनी लियॉन हिने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले आहे. सनी आणि तिचा पती डेनियल प्लेनने प्रवास करत असताना त्यांचं प्लेन क्रेश झालं होतं. त्यामुळे त्यांना प्लेनची तात्काळ लँडिंग करावी लागली होती. तात्काळ लँडिंग झालं नसतं तर त्या दोघांचा ही प्राण जाण्याची संभावना होती.

हेमा मालिनी – २०१५ साली हिंदी चित्रपटसृष्टीतील ड्रीम गर्ल हेमा मालिनीला एका भयानक अपघाताला सामोरे जावे लागले होते. तो कार अपघात इतका भयानक होता की एका लहान निरागस मुलीचा बळी त्या अपघाताने घेतला. या अपघातामध्ये हेमा मालिनीचा नाकावर फार गंभीर दुखापत झाली होती.

सैफ अली खान – हिंदी चित्रपटसृष्टी छोटे नवाब म्हणून ओळख असलेला सैफ अली खानसुद्धा अशाच एका अपघाताला सामोरे गेला होता. हल्लीच प्रदर्शित झालेल्या तानाजी या चित्रपटात त्याने सुभेदार उदयभान याची भूमिका साकारली आहे. “क्या कहना” या सैफच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका मोठ्या खडकावर त्याचं डोकं आपटलं होतं. त्याच्या या अपघातामुळे त्याच्या डोक्याला १०० टाके पडले आणि यावरूनच आपल्याला अंदाज येईल की हा अपघात प्रचंड गंभीर होता.

सोनू सूद – जोधा अकबर, एक विवाह ऐसा भी, दबंग आणि हैप्पी न्यू ईयर या चित्रपटांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या सोनू सूदला आपण सगळे ओळखतोचं. हल्लीच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जबरदस्त अपघात झाला होता आणि त्या अपघातादरम्यान त्यांचा कारला आग लागली. अपघात होताच क्षणी जर सोनू कारमधून बाहेर आले नसते तर नक्कीच त्यांच्या जीवावर बेतलं असतं.

प्रिती झिंटा – हिंदी चित्रपटसृष्टीतील डिंपल गर्ल प्रिती जिंटा एकदा नव्हे तर दोनदा ती या अपघाताना सामोरे गेली आहे. पहिल्या वेळेस कोलंबिया मध्ये शूटिंग करत असताना ती बॉम्ब धमक्याचा शिकार होता होता थोडक्यात वाचली. तर दुसऱ्या वेळेस जेव्हा ती थायलंडला फिरायला गेली असताना त्या ठिकाणी त्सुनामी आली होती परंतु ती या घटनेतून बचावली.

वरील सर्व घटना ऐकून आपण इतकंच म्हणू शकतो की देव तारी त्याला कोण मारी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *